अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा कहर अद्यापही कायम असल्याने देशभर सणउत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नुकताच झालेला गणेश उत्सव देखील अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. आता याच अनुषंगाने नवरात्रीचा उत्सव देखील सध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
अवघ्या काही दिवसांवर आलेला नवरात्रीच्या सणाच्या निमित्ताने नगरमधील केडगाव देवीं प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नगरकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिराबाहेर यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनात समाधान मानावे लागणार आहे . देवस्थान समिती व प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे .
केडगावच्या रेणुकामंदिरात येत्या १७ तारखेला सकाळी ९ वाजता घटस्थापना होणार आहे . मात्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांमुळे मंदिरे भाविकांसाठी अजुन खुले करण्यात आलेली नाहीत .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केडगावच्या देवीमंदिर परिसरात यंदा नवरात्रेची यात्रा भरणार नाही . यात मंदिर परिसरात भाविकांना थेट दर्शन टाळावे
तसेच मंदिराबाहेर मोठे स्क्रिन लाऊन ऑनलाईन दर्शनाची सुविधा निर्माण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. तसेच मंदिर आवारात सॅनिटायझरचा वापर करणे
व मंदिर आवारात कोणतेही स्टॉल लागणार नाही याची दक्षता घेण्याची सुचना देण्यात आली आहे. मंदिर परिसरात भाविकांना मज्जाव असला तरी
मंदिरात दरवर्षि प्रमाणे घटस्थापना, दोन वेळा आरती, पंचमीला कुंकुम, सातव्या माळेला फुलोराचा नैवेद्य, आदि धार्मिक विधी नियमाप्रमाणे होणार आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved