कोरोना इफेक्ट: मुंबईत दोन टप्प्यात होणार शाळांची सुरवात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-मुंबईतील कोरोनाचा वाढत धोका लक्षात घेता १५ जूनपासून एकही शाळा प्रत्यक्षात सुरू होणार नाहीत. यासाठी दोन टप्प्यात शैक्षणिक वर्षाची सुरूवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात डिजिटल आणि दुस-या टप्प्यात फिजिकल असं या शैक्षणिक वर्षाचं स्वरुप असणार आहे. १५ जूनपासून ऑनलाईन लर्निंग फॉर्म होम संकल्पना सुरू होणार आहे.

सध्या मुंबईतील अडिच लाख विद्यार्थ्यांनी दिक्षा मोबाईल ऍप डाऊनलोड केला असून अडिच लाख विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाची सॉफ्ट कॉपी पोहचवण्यात आली आहे.

तसंच गूगल क्लास, झूमद्वारेही शिक्षक विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केलं जाणार आहे.

सध्या पालिकेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याच्या कामास सुरूवात झाली असून कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर शिफ्टमध्ये शाळा सुरू केली जाणार आहे.

यात एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल असे नियोजन करून वर्ग भरवले जाणार आहेत. सध्या विद्यार्थ्याच्या घरी अँड्रॉईड मोबाईल आहे का ?

तो मुंबईबाहेर आहे की मुंबईत ? १५ जून तसंच १ जुलैपर्यंत येवू शकणा-या विद्यार्थ्यांची संख्या किती ? अशी माहिती गोळा केली जात आहे.

१५ जूनपर्यंत शालेय पुस्तके सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकार निर्मित दिक्षा ( Diksha) या मोबाईल ऍपद्वारे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24