कोरोना इफेक्ट! बेरोजगारांनी बदलला आपला व्यवसाय…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने अनेक उद्योग धंदे बंदच होते. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान अनेकांचा व्यवसाय बंद असल्याने आर्थिक डोलारा अक्षरश कोलमडला होता.

यातच बेरोजगारीची ग्रासलेल्यांनी नवीन व्यवसायाची निवड करत आपली उपजीविका भागवत आहे. कोरोना काळात प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद होती. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली.

या संकटावर मात करण्याकरिता नेवासे तालुक्यातील कुकाणे व परिसरातील अनेक गावांतील रिक्षाचालकांनी फळ व भाजीपाला विक्रीचे दुकान सुरु केले आहे.

लॉकडाऊनदरम्यान बससेवा बंद असल्याने प्रवासी वाहतूक ठप्प होती. तसेच शहरासह मोठ्या बाजारपेठ असलेल्या गावातील अंतर्गत वाहतूकही बंद असल्याने रिक्षा पूर्णत: बंद होते. त्यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक स्रोत बंद झाले.

नेवासे तालुक्यातील कुकाणे, भेंडे, भानसहिवरेसह परिसरातील अनेक गावांतील तब्बल 86 रिक्षाचालकांसह मालकांनी या कोरोना परिस्थितीवर मात करीत फळ- भाजीपाला विक्रीचे दुकने सुरु केले.

त्यांनी कुकाणे, भेंडे, भानसहिवरे, नेवासे फाटा येथील मुख्य रस्त्यांसह गल्लोगल्ली व खेडोपाडी जाऊन फिरते भाजीपाला व फळ विक्री सुरू केली.

यात सर्वाधिक 54 कुकाणे येथील रिक्षाचालक व मालक या व्यवसाय करत आहेत या संकटामुळे अनेकांना आपला हातचा रोजगार गमवावा लागला होता.

मात्र या आवाहनातम्क संकटाला तोंड देत नेवासे तालुक्यातील व्यवसायिकांनी पुन्हा थाटात आपले व्यवसाय सुरु केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24