पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात करोनाचा उद्रेक सुरूच असून, गेल्या २४ तासात आणखीन १५६ जणांना करोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे बाधितांची संख्या चार हजार जनावर जाऊन पोहचली आहे. एकीकडे बाधितांची संख्या शंभरीच्या पुढे असून,

दुसरीकडे ठणठणीत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्याही ११० आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या २४ तासात १ हजार ४५९ जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यामध्ये १४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून,

नायडूमधील ९६, ससूनमध्ये ११ आणि खासगी रुग्णालयात ४२ बाधित व्यक्ती सापडले आहेत.

बाधितांबरोबर क्रिटिकल रूग्णाची संख्या वाढतच आहे. १५६ जणांची प्रकृती चिंताजनक असून,

त्यातील ४३ जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे तर ११३ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सद्यःस्थितीत शहरातील विविध रूग्णालयात मिळून १ हजार ६३० बाधितांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24