कोरोनामुळे मंगल कार्यालय चालक सापडले आर्थिक अडचणीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- गेल्या सहा ते सात महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक व्यवसाय ठप्प होते. मिशन बिगेन अंतर्गत राज्यात अनेक व्यवसायांना पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र अद्यापही काही व्यवसाय असे आहे कि जे सुरु आहे, मात्र त्यामध्ये दिलेल्या अटी व नियमांमुळे व्यवसायिकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे.

यातच जिल्ह्यात मंगल कार्यालये, लॉन्स या ठिकाणी अद्यापही 50 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मंगल कार्यालय चालक अडचणीत सापडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अकोले तालुक्‍यात दरवर्षी नवरात्रोत्सवात शहरातील लॉन, मंगल कार्यालयांत रंगणारा गरबा या वर्षी पाहायला मिळणार नाही.

कोरोनामुळे शहरातील लॉन, मंगल कार्यालये आठ महिन्यांपासून बंद आहेत. ते उघडण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने लॉन, मंगल कार्यालयांच्या चालकांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

मंगल कार्यालयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील लॉन आणि मंगल कार्यालयांच्या चालकांची संघटनादेखील नाही. कोरोनामुळे लॉन, मंगल कार्यालये बंद आहेत.

देखभाल- दुरुस्ती खर्च, वीजबिल, कामगारांचे पगार, पाणीपट्टी हा खर्च चालकांना करावाच लागतो. लॉन आणि मंगल कार्यालये लवकर सुरू न झाल्यास ती बंदच करावी लागतील.

त्यामुळे सरकारने लॉन आणि मंगल कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अगस्ती मंगल कार्यालयाचे बाळासाहेब नाईकवाडी यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24