कोरोना गो… गो कोरोना म्हणाऱ्या रामदास आठवले यांना कोरोनाचा लागण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता कोरोना व्हायरस विरोधात गो कोरोना, कोरोना गो अशी घोषणा देऊन सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेच कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे.

नुकतीच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान आठवलेंना सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात अभिनेत्री पायल घोष हीने रिपब्लिकन पार्टीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्या कार्यक्रमात रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित असल्याने त्यांना सुद्धा क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24