महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या असून मुंबईने आता साडेबावीस हजारांचा रुग्णसंख्येचा टप्पा गाठला आहे.
त्यामुळे आता या शहरांत प्रशासनाने नवीन ऍक्शन प्लॅन आखला आहे. *पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोननुसार प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे.
या छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कडक असतील, तर इतरत्र व्यवहारांना सुरुवात करण्यास परवानगी देण्यात येईल. * प्रतिबंधित क्षेत्रात केवळ जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार.
यामध्ये दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने, दवाखाने, स्वयंपाकाचा गॅस या व्यतिरिक्त इतर सुविधांना परवानगी नाही. * 31 तारखेपर्यंतच्या लाॅकडाऊनसाठी नवी नियमावली तयार करण्यात येईल.
त्यामध्ये पथारी व्यावसायिकांनाही ठराविक रस्ते वगळता व्यवसाय करता येणार आहे. कोरोनाची स्थिती सरकारच्या ताब्यात आहे. १ लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. मात्र असं असलं तरी घाबरण्याचे कारण नाही.
सरकारी हॉस्पिटल्समधली 80 टक्के बेड्स सरकारने ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्याची सद्यस्थिती पहिली तर पुण्यात दिवसभरात 149 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.
पुण्यात आज 8 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 156 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत,
अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3747 झाली आहे आतापर्यंत 207 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 1920 जणांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं आहे.