अहमदनगरमधील रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीडमधील तरुणास कोरोना !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगरमधील रुग्णाच्या संपर्कात आल्याने बीडमधील तरुणास कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

नगर तालुक्यातील अलमगीर येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील 84 संशयितांचे सोमवारी तर मंगळवारी आणखी 61 असे 145 स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते.

यातील 83 व्यक्तींचे अहवाल सोमवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झाले होते. यात एकाला कोरोना व्ह्यायरसची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

आष्टी (ता. बीड) येथील रहिवासी मात्र, आमलगिर (ता. नगर) येथील कोरोना बाधीताच्या संपर्कात आलेला एका व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे.

यामुळे बीड जिल्ह्यातील पहिला कोरोना बाधीत रुग्ण समोर आला आहे. आता सापडलेला हा रुग्ण आष्टी तालुक्यातील असून तबलीगी जमातमध्ये सहभागी झालेल्या नगर जिल्ह्यातील काहींच्या तो संपर्कात होता.

मागील 24 मार्चपासून अहमदनगर येथील भिंगार भागातील मशिदीत त्याने काही काळ वास्तव्य केल्याची माहिती आहे. ता. दोन एप्रिलला तो बीड जिल्ह्यात गेला होता.

कोरोनाला वेशीतच अडविणाऱ्या बीड जिल्ह्यात अखेर बुधवारी (ता. आठ) पहिला कोरोना रुग्ण आढळला.

दरम्यान आतापर्यंत 100 जणांच्या स्वॅबची तपासणी केली असून, 98 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, एक अहवाल येणे बाकी आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24