अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सेवेवर मोठा ताण होता, जिल्हा रुग्णालयाच्यावतीने जिल्हातील नागरिकांना चांगली सेवा देऊन कोरोना अटोक्यात आणण्यात येत आहे.
कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत विविध प्रकारच्या मदतीबरोबरच आरोग्य सेवेतही सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृता निर्माण होऊन कोरोनाची भिती नाहिशी होऊन अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले.
सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. पुढील काळात त्यावर आपण नक्कीच मात करु, असे प्रतिपादन नुतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांनी केले.
मखदुम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी व अलकरम सोसायटीच्यावतीने नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांचा रुग्ण मित्र नादीर खान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी आबीद दुलेखान, तौफिक तांबोळी आदि उपस्थित होते. याप्रसंगी नादीर खान म्हणाले, गोर-गरिब, सर्वसामान्यांना जिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार आहे.
रुग्णालयातील सेवांमुळे अनेकांना उपचार मिळत असल्याने मोठा आधार वाटतो. सध्याच्या कोरोना काळात जिल्हा रुग्णातील चांगल्या सेवेचे अनेकांनी अनुभव घेऊन कौतुक केले.
नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोखरणा यांनीही कोरोना काळात रात्रं-दिवस परिस्थिती हातळल्याने कोरोना आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
त्यांच्या या सेवेमुळेच त्यांची पदोन्नत्ती झाली आहे. पुढील काळातही जिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगली सेवा मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त केली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved