महाराष्‍ट्रात सर्वाधिक कमीदरामध्‍ये कोरोनाची होतेय ‘इथे’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  शिर्डी शहरातील नागरीकांना अतिशय कमीदरात कोवीड टेस्‍ट करता यावी यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या सहकार्याने डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या माध्‍यमातून कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राची सुरुवात करण्‍यात आली.

अतिशय कमी दरामध्‍ये कोरोना चाचणी करण्‍याचा राज्‍यातील शिर्डी मतदार संघात सुरु करण्‍यात आला आहे. तालुक्‍यात कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून पद्मश्री डॉ.विखे पाटील फौंडेशनने आणि शिर्डी नगरपंचायत यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शहरात कोरोना चाचणी संकलन केंद्र सुरु करावे अशी मागणी होत होती.

कमी दरामध्‍ये या चाचणीची सुविधा निर्माण व्‍हावी यासाठी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेमोरीअल हॉस्‍पटलच्‍या सहकार्याने ही सुविधा शहरामध्‍ये सुरु झाली आहे. या चचाणी केंद्राचे उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले.

याप्रसंगी नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, उपनगराध्‍यक्ष मंगेश त्रिभूवन, ज्ञानेश्‍वर गोंदकर, अभय शेळके, प्रतापराव जगताप, नगरसेवक सुजित गोंदकर यांच्‍यासह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, कोरोनाचे संकट दिवसागणीक वाढत आहे.

सर्वच नागरीकांची कोरोना चाचणी करण्‍यासाठी प्रशासनाच्‍या मर्यादा आहेत. महाराष्‍ट्रात सर्वाधिक कमीदरामध्‍ये कोरोनाची चाचणी डॉ.विखे पाटील मेमोरीअल हॉस्‍पीटलच्‍या माध्‍यमातून होत आहे.

शिर्डी नगरपंचायतीच्‍या सहकार्याने जेष्‍ठ नागरीक आणि १० वर्षांच्‍या आतील वयोगटातील बालकांसाठी नगरपंचायतीने ठराव करुन सहकार्य करण्‍याचा निर्णय घेतल्‍याने सदर चाचणी ५०० रुपयातच होणार असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24