अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे एकाच कुटुंबात सहा जणांना कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर त्याच कुटुंबातील हे सर्व सहा बाधित आहेत.
जवळच्या हसनापूर गावातही एकाला करोनाची बाधा झाली. लोणी बुद्रुक गावात मंगळवारी एकाच इमारतीत 12 करोना बाधित आढळले होते. त्याचवेळी लोणी खुर्द गावातील आशीर्वादनगरमधील एक व्यक्तीही बाधित निघाली होती.
त्या व्यक्तीला प्रवरा कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले असताना बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. आरोग्य यंत्रणेने त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले.
काल या व्यक्तीच्या कुटुंबातील सहा जणांचे स्राव तपासल्यानंतर त्याची पत्नी, बहीण, मुलगा, सून आणि नातू बाधित असल्याचे दिसून आले. लोणी जवळच्या हसनापूर गावठाणमध्ये बुधवारी करोनाने शिरकाव केला.
गावाच्या हद्दीत पण संगमनेर रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी सहा बाधित व्यक्ती आढळून आले होते. पण त्यांचा गावाशी कोणताच संपर्क नव्हता. आत्तापर्यंत गावात मात्र एकही बाधित व्यक्ती नव्हता.
पण काल शेतकरी असलेल्या एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने प्रशासन आणि हसनापूर ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यापुढे कोरोनाचा संसर्ग गावात वाढू नये म्हणून गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर उपायोजना तयार केल्या आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved