कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-कोरोनामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३३० झाली आहे.

६३२ नवे रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोविड चाचणीसाठी नागरिकांची फरफट अजूनही कायम आहे. नगर शहरातील रामकरण सारडा वसतिगृहातील चाचणी केंद्रात सकाळपासूनच लोक येतात.

अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची चाचणी केली जाते. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ३०६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात गुरूवारी २४ ची भर पडली. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३ हजार ४५ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत ६६, अँटीजेन चाचणीत ३१५ आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५१ बाधित आढळले.

जिल्ह्यातील करोनना मृत्यू बद्दल शंका उपस्थित केली जात असताना आज अचानक हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24