अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानी लागोपाठ दुसऱ्या दिवशी आणखी एका शासकीय कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले
सोमवारी मुख्यमंत्री ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक यांचा कोविड चाचणी अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला होता.
त्यानंतर आता आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला. मुख्यमंत्र्यांच्याच वर्षा निवास्थानी कोरोनाचा शिरकाव शिरकाव झाल्याने चिंतेचे वातावरण निर्णाण झाले आहे.
नाईक यांना वोक्हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधिकरी आणि कर्मचाऱ्यांची कोविड 19 चाचणी करण्यात येत आहे.
वर्षा निवास्थान परिसरातील सर्व शासकीय आणि खासगी निवास्थानी रहात असलेल्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत की नाही..?
याची सखोल तपासणी आता बीएमसीने सुरू केली आहे. तसेच गरज भासल्यास आजारी आणि संशयित व्यक्तींची कोविड 19 चाचणी करण्यात येत आहे.