कोरोना अनुमानित तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- सांगलीमध्ये कोरोना अनुमानित तरुणाने सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाली.

संबंधित तरुणाची मन:स्थिती ठीक नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी दिली. सांगलीच्या कुपवाड रोडवरील लक्ष्मीनगरच्या एका ३० वर्षीय तरुणावर कोरोना अनुमानित म्हणून सातारा जिल्हा रुग्णालयातील क्वॉरंटाइन वॉर्डमध्ये काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत.

रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या तरुणाची अचानक मन:स्थिती बिघडल्यामुळे त्याने वॉर्डमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी तत्काळ वॉर्डमध्ये जाऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24