अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ११ नोव्हेंबरला शून्य होता.
मात्र, दिवाळीतील वाढत्या गर्दी आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. बुधवारी एकाच दिवसात श्रीरामपुरात १६ रुग्ण सापडल्याने प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होत असल्याने या वर्गांना शिकवणाऱ्या सुमारे एक हजार शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या सुरू करण्यात आल्या असून त्यांचे अहवाल नगर येथून प्राप्त होणार आहेत.
११ नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोरोना केअर सेंटरमध्ये ५४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.
त्यानंतर दिवाळीची वाढती गर्दी व नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे कोरोनाचा आलेख वाढायला सुरुवात झाली आहे. १२ नोव्हेंबरला २२८ जणांची तपासणी करण्यात आली.
त्यात ३ बाधित आढळले. १३ नोव्हेंबरला ४२ जणांची तपासणी झाली. त्यात ५ बाधित आढळले. १६ तारखेला ३१ जणांची तपासणी केली गेल-ी. त्यात ६ बाधित आढळले. १७ तारखेला १३५ रॅपिड व २७ शिक्षकांच्या आरटीपीसीआर तपासणी झाली.
त्यात ९ बाधित सापडले. १८ तारखेला १८५ रॅपिड तर १३५ शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved