अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे मुंबईहून निघोज येथे आलेल्या जावयास शनिवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.
मूळ पारनेरचा रहिवासी असलेला जावई ३० मे रोजी मुंबईहून निघोज येथे पत्नी, मुलगी व मुलासह सासुरवाडीला आला. संस्थात्मक विलगीकरणाऐवजी स्वतंत्र बंगल्यात जावयाचे कुटुंब विलगीकरण करून ठेवण्यात आले.
काही दिवसांपासून जावयास श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेस ही माहिती देण्यात आली. आरोग्य विभागाने शनिवारी सायंकाळी त्यांना नगर येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले.
कोरोनासदृश लक्षणे आढळल्यामुळे घशातील स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले. यापूर्वी निघोजचा रहिवासी असलेल्या तरूणाचा पिंपरीजलसेन येथे कोरोनामुळे उपचारापूूर्वीच मृत्यू झाला.
त्यामुळे त्या तरूणाच्या संपर्कातील निघोज, पिंपरीजलसेन, पठारवाडी व चिंचोली येथील नातेवाईकांची तपासणी करण्यात येऊन त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
सुदैवाने तरूणाच्या पत्नीसह त्याच्या संपर्कात आलेल्या ३१ जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आलेले निघोज गाव पुन्हा खुले करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews