अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदा : कोरोनाने सगळीकडे थैमान घातले असून, शहरी भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत ग्रामीण भाग कोरोनाच्या प्रसारपासून लांब होता. परंतु बारामती येथील एक रिक्षावाला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर श्रीगोंद्याच्या उंबरठ्यावर कोरोना येऊन दाखल झाला आहे.
याचे कारण म्हणजे बारामतीच्या ‘त्या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आल्यामुळे आता तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, काल दिवसभर याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. तसेच लोक फोन करून याबाबत माहिती घेऊन विचारपूस करत होते.
या तिन्ही संशयितांना तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून सांगण्यात आले. या तिघांचे तपासणी अहवाल येणे बाकी असले तरी शहरी भागात थैमान घालणारा कोरोना आता ग्रामीण भागाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
ग्रामीण भागात कोरोना येऊ शकत नाही, अशा अविर्भावात काही मंडळी लॉकडाऊन असतानाही बेफिकिरपणे रस्त्यावरून फिरत आहेत. प्रशासन वारंवार सांगूनही लोकांच्या मानसिकतेत फरक पडत नाही. आता हे संकट श्रीगोंदे तालुक्याच्या उंबरठयावर येऊन ठेपले आहे. आता तरी बेफिकीरपणा सोडा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com