मुंबई /प्रतिनिधी कोरोनाने अनेक उद्योगधंद्यांवर संक्रांत आणली आहे. अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यानादेखील खूप मोठा फटका असला आहे.
त्यामुळे झोमॅटोने आता आपल्या 13 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जून महिन्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी 50 टक्के पगार कपात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या संदर्भात झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी पाठवण्यात आलेल्या नोटीशीमध्ये संस्थापक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी स्पष्ट केले की, आमच्या कामावर आम्हाला लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि हीच आमची इच्छा आहे.
पण भविष्यात आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे आम्हाला जमणार नाही. तसेच येत्या 24 तासात सर्व टीम लीडर्सकडून ज्यांची नोकरी गेली आहे,
त्यांना झूम कॉल करून सांगण्यात येणार आहे आणि ज्यांची नोकरी टिकली आहे. त्यांनाही त्या स्वरूपाचा मेल एचआरकडून येईल, असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.