कोरोनाचा जामखेडमध्ये धुमाकूळ, कर्जत तालुक्यास धोका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- कर्जत आणि जामखेड यांचा पूर्ण संपर्क तोडण्यात यावा, नगर-कर्जत संपर्काचे प्रमाण वाढत असल्याने कर्जत तालुक्यास करोनाचा धोका संभवतो आहे. याची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी, असी मागणी जोर धरू लागली आहे.

कर्जत तालुक्याच्या सर्वात जवळचा तालुका जामखेड आहे. या दोन्ही तालुक्यांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे. करोना आजाराने जामखेडमध्ये धुमाकूळ घातला आहे.

जिल्ह्यातील सर्वात जास्त 14 रुग्ण जामखेडला आढळले आहेत. संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेकडो लोकांना कॉरंटाईन केलेले आहे. अनेक परिसर हॉटस्पॉट करण्यात आले आहेत.

एवढी गंभीर परिस्थिती जामखेडमध्ये निर्माण झालेली असतानाही आजही कर्जत आणि जामखेड तालुक्यातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. ही बाब गंभीर मानली जात आहे.

जामखेड तालुक्यामध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतरच लगेच या दोन्ही तालुक्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्याची गरज होती. दुर्दैवाने तसे झाले नाही. आजही चोंडी किंवा इतर मार्गाने कर्जत-जामखेडची वाहतूक सुरू आहे.

यामुळे सर्वात मोठा धोका कर्जत तालुक्यामध्ये होऊ शकतो, असे मत व्यक्त करीत नागरिकांमध्ये घबराट आहे. प्रशासनाने यापूर्वीच गंभीरपणे याची दखल घेण्याची गरज होती.

करोना विषाणूंचा प्रसार सर्वत्र झपाट्याने होत असताना कर्जत तालुक्यांमध्ये मात्र अद्याप एकही रुग्ण आढळला नाही, ही तालुक्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. एक प्रकारे कर्जतकरांनी सध्या तरी करोनावर विजय मिळविल्याचे दिसूून येते.

यामध्ये स्थानिक प्रशासन व नागरिक यांचे मोठे यश आहे, हे मान्य केले पाहिजे. परंतु यामुळे सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. ही परिस्थिती राखण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24