कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी ३ दिवसांत झालेत तब्बल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रकोप  दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणूचा संसर्गामुळे मृत्यूंचे तांडव देखील सुरू झाले आहे. अहमदनगरकरांची काळजी वाढवणारी बातमी आहे कारण नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत गेले तीन दिवसांत सुमारे १०० मुत्यू झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 2210 रुग्ण जिल्ह्यात वाढले आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – 

अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत जिल्हा रुग्णालयानुसार 960, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 484 आणि रॅपिड चाचणीमध्ये 766 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

‘ह्या’ ठिकाणी आढळले सर्वाधिक रुग्ण :- आजही नगर शहरात पाचशेच्या पुढे रुग्णसंख्या गेली. नगर शहरात 534 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ संगमनेर, पाथर्डी, राहाता, काेपरगाव, अकाेले, कर्जत, श्रीरामपूर, राहुरी, नगर तालुक्यातील रुग्णांची संख्या शंभरच्या पुढे गेली आहे.

तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :- अहमदनगर शहर 534, राहाता 183, संगमनेर 163, श्रीरामपूर 162, नेवासे 87, नगर तालुका 115, पाथर्डी 60, अकाेले 111, काेपरगाव 87, कर्जत 150, पारनेर 105, राहुरी 140, भिंगार शहर 50, शेवगाव 107, जामखेड 81, श्रीगाेंदे 52, इतर जिल्ह्यातील 10 आणि मिलिटरी हॉस्पिटल 14 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन ? :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24