कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण ! जाणून घ्या कोरोनाची अहमदनगर , राज्य व देशातील आकडेवारी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 2654 रुग्ण वाढले आहेत कालही 1998 रुग्ण वाढले होते. 

अहमदनगर जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – 

नगर शहरात 476 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरापाठाेपाठ कोपरगाव, संगमनेर, राहता आणि श्रीरामपूर येथे रुग्ण संख्याही 200 च्या पुढे गेली आहे.

त्याखालाेखाल कर्जत राहुरी, अकोले, नगर तालुका, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी तालुक्यामध्ये शंभरच्या पुढे रुग्णसंख्या आहे. अहमदनगर शहर 476, राहाता 215, संगमनेर 219, श्रीरामपूर 200,

नेवासे 114, नगर तालुका 105, पाथर्डी 114, अकाेले 145, काेपरगाव 294, कर्जत 162, पारनेर 119, राहुरी 151, भिंगार शहर 71, शेवगाव 92, जामखेड 33, श्रीगाेंदे 124,

इतर जिल्ह्यातील 13 आणि मिलिटरी हॉस्पिटल 07 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 651, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 582 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1421 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

राज्यात 51 हजार 751 नवे रुग्ण :- राज्यात 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आसून 258 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 52 हजार 312 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आले आहेत.

देशात २४ तासांत १ लाख ६१ हजार रुग्ण :- भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात आतापर्यंतचा उच्चांक :- देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.

देशात असे झालेय लसीकरण :- आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24