कोरोना माझ्या गाण्यामुळे गेला; आठवले यांनी केला मोठा दावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-  आठवले यांनी मार्चमध्ये कोरोनो गो… गो कोरोना… गो… असे म्हणत कोरोनाला पळवून लावण्यासाठी विदेशी नागरिकांसोबत व्हिडीओ पोस्ट केला होता. आठवले यांचा हा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणावर व्हायरल झाला होता.

आठवले विनोदी गोष्टी करण्यात पटाईत आहेत.त्यामध्ये चायना-इंडिया साँग असे म्हणत, रामदास आठवले कोरोनो गो… गो कोरोना… गो… असे म्हटले होते.

तर आठवलेंसमवेत असलेला विदेशी नागरिकही गो कोरोना… कोरोना गो… असे म्हणत होता. उल्लेखनीय गोष्ट ही की त्या नागरिकाच्या हातात मेणबत्ती दिसत होती.

वरून त्या नागरिकाकडे भारताचा ध्वज पन दिसून आला. रामदास आठवलेंच्या या व्हिडीओवरुन अनेकांनी त्यांना ट्रोल केले होते. तसेच केंद्रीयमंत्र्यांना हे शोभतं का, असा सवालही नेटीझन्सने केला होता.

रामदास आठवले हे त्यावेळी मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले होते. आता आठवले यांनी मोठा दावा केला आहे. मी गो कोरोना गो घोषणा दिल्यामुळेच कोरोना गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

आता नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनसाठी मी नवीन स्लोगन ‘No Corona, Corona No’ देत आहे, असे आठवलेंनी म्हटले आहे.आठवले हे नवनवीन गोष्टी करण्यात वाकबगार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24