अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- शहरासह नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. दरदिवशी कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी समोर येत आहे.
कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्येच कोपरगाव तालुक्यात एकूण 35 जण कोरोना बाधीत झाले आहे तर आज 18 जण कोरोना मुक्त झाले आहे.
कोपरगाव येथे आज 147 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 28 बाधीत तर 119 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर 6 खाजगी लॅब मधील अहवाल पॉझिटिव्ह आले आहे
तसेच नगर येथील अहवालात 1 बाधीत तर आज परत नगर येथे 20 रुग्णांचे स्रावचे नमुने तपासणी करीत पाठविले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत एकूण रुग्ण संख्या 1 हजार 548 झाली आहे त्यापैकी सध्या उपचार चालू असलेले 182 रुग्ण असून, आतापर्यंत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर उर्वरित 1340 रुग्ण उपचारानंतर कोरोना मुक्त झाले आहे.
दरम्यान लोकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही आरोग्य प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेले नियम पाळून, स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved