मुंबई महाराष्ट्रात मुंबई आणि पाठोपाठ पुणे या शहरांमध्ये रुग्ण संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक उपाययोजनेनंतरही मुंबईत कोरोना रुग्णांची वाढ होताच आहे.
आणखी 1411 नव्या रुग्णांची भर पडली असून मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 22 हजार 563 वर पोहोचला आहे. मुंबईत मृत झालेल्या 43 जणांमध्ये 29 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे.
यातील 32 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते अशी माहितीही पालिकेकडून देण्यात आली. यामुळे एकूण मृतांचा आकडा 800 झाला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या रुग्णालयांचा दुसऱ्यांदा आढावा घेणे सुरू केले असून आज कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी महापालिका रूग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक व त्यांच्या टीम सोबत चर्चा केली. महापौर किशोरी किशोर पेडणेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, रुग्णालयाने ज्येष्ठ नागरिकांना ऑक्सीमीटर उपलब्ध करून द्यावे,
जेणेकरून जेष्ठ नागरिक स्वतः आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासून घेतील. ज्या ज्येष्ठ नागरिकाचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे ते स्वतःहून रुग्णालयात दाखल होतील. त्यामुळे कोरोना बाधितांसोबत त्यांचा थेट संपर्क येणार नाही.
असे ते म्हणाले. याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद नगरकर, डॉ. तनुजा बारोट, डॉ. अंकुश, डॉ.सत्यजित उपस्थित होते. ‘लाफिंग थेरपी’चा अवलंब दादरमध्ये कोरोनाबाधित लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ‘लाफिंग थेरपी’चा प्रयोग करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.