कोरोनाचा जेलमध्ये शिरकाव ; कैदी आढळले पॉझिटिव्ह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :- जिल्हयात कोरोनाचा वाढता वेग हा प्रशासनासाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे.

दरम्यान राहुरी तालुक्यात असलेला जेलमध्ये आता कोरोनाने शिरकाव केला आहे. या कारागृहातील तब्बल 31 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

त्यात, पाच महिला कैद्यांचा समावेश आहे. बुधवारी (दि.16) दुपारपर्यंत 26 कैद्यांना नगर येथील जिल्हा कारागृहाच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले. कैदी कोरोनाबाधित झाले यास पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला आहे.

या कैद्यांना अटक करताना कोरोना तपासणीचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वी त्यांना इतर कैद्यांच्या बरोबर कोठडीत टाकण्यात आले. यामुळे इतरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

पंधरा दिवसांपूर्वी अटक केलेल्या दोन कैद्यांना कोरोना अहवाल येण्यापूर्वी कोठडीत टाकले होते. पैकी, एक कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच वेळी, कारागृहात कोरोना संक्रमण होऊन, लवकरच कोरोना फोफावणार अशी शकयता होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24