साईबाबांच्या ‘ह्या’ उत्सवावरही कोरोनाचे सावट; होणार ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.

मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले.आताही श्री साईबाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 24 ते सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2020 या कालावधीत होणार आहे.

उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार आयोजित करण्यात येणार्‍या प्रतिकात्मक भिक्षा झोळीकरिता गावकरी/साईभक्तांकडून भिक्षा स्विकारण्याकामी मंदिर परिसरात व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.

श्रींचा पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रुढी परंपरेनुसार भिक्षा झोळीचा कार्यक्रम होत असतो. त्या अनुषंगाने उत्सवाच्या मुख्य दिवशी आयोजित करण्यात येणार्‍या भिक्षा झोळीकरिता गावकरी व साईभक्तांकडून भिक्षा स्विकारण्याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर 4, पिंपळवाडी रोड गेट नंबर 2, चावडीसमोर,

नाट्यगृहाशेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी गावकरी व साईभक्तांनी भिक्षा झोळीत दान भिक्षा देताना मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतरासंदर्भातील नियमांचे पालन करून भिक्षाझोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी. तसेच संस्थानचे संरक्षण व दान भिक्षा स्विकारणार्‍या कर्मचार्‍यांना सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात येत आहे.

असा असेल कार्यक्रम :-

१) 24 ऑक्टोबर प्रथम दिवस (शनिवार) :- पहाटे 4.30 – श्रींची काकड आरती, पहाटे 5 – श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे 5.15 – व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे 5.40 – श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 – श्रींची पाद्यपूजा दुपारी 12.30 – माध्यान्ह आरती, दुपारी 4 ते 6 – कीर्तन कार्यक्रम (समाधी मंदिरातील स्टेजवर), सायंकाळी 6 – धुपारती , रात्री 10.30 – श्रींची शेजारती ( श्री साईसच्चरित अखंड पारायण श्री द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहील.)

२) 25 ऑक्टोबर दुसरा दिवस (रविवार) :- पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस . पहाटे 4.30 – श्रींची काकड आरती, पहाटे 5 – अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे 5.20 – श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 – श्रींची पाद्यपूजा, सकाळी 8.30 ते 9 – भिक्षा झोळी कार्यक्रम,

सकाळी 10 – किर्तन कार्यक्रम तसेच सकाळी 10.30 वाजता श्रींचे समाधीसमोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती तर सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन कार्यक्रम, सायंकाळी 6 वाजता धुपारती होईल तर रात्री 10.30 वाजता श्रींची शेजारती होईल.

3) 26 ऑक्टोबर तिसरा दिवस (सोमवार) :- पहाटे 4.30 – काकड आरती, सकाळी 5.20 – श्रींचे मंगलस्नान, सकाळी 6 – श्रींची पाद्यपूजा, सकाळी 6.30 – गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा, सकाळी 10 – गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम , दुपारी 12.10 – श्रींची माध्यान्ह आरती, सायंकाळी 6 – श्रींची धुपारती, रात्री 10.30 – शेजारती

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24