लॉकडाऊन नियमावली जाहीर : ‘या’ सर्व सेवा रहाणार बंद,मास्क घालणं अनिवार्य तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यासाठी आज गृहमंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहेत. यात शेती आणि विशिष्ट उद्योगांसाठी ग्रामीण भागांना विशेष सवलती देण्यात आल्या आहेत.

सर्व आंतरराज्यीय विमानवाहतूक, ट्रेन (पॅसेंजर), सर्व शैक्षणिक संस्था, औद्योगिक आणि कमर्शियल कामे, हॉटेल, टॅक्सी, ऑटोरिक्षा, सायकल रिक्षा, चित्रपटगृहे, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, बार, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, सर्व धार्मिक कार्यक्रम बंद राहणार आहे.

तसेच किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी नवीन नियमावली असेल. ही नियमावली 20 एप्रिलनंतर जारी करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क घालणं देखील अनिवार्य असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे.सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरणयोग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे, मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याचवेळी देशातील काही भागात 20 एप्रिलनंतर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात येणार असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

’20 एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल. मात्र त्यालाही काही नियम व अटी असतील,’ अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

अहमदनगर लाईव्ह 24