वृत्तसंस्था :- रत्नागिरी शहरात वैयक्तिक वादातून मित्रानेच मित्राची गोळ्या झाडून हत्या केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी सावकारी व्यवहार करणारा आनंद क्षेत्री रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास त्याच्या 5 मित्रांसह चारचाकी गाडीतून जात असताना गाडीतील त्याच्या एका मित्रानेच रिव्हॉल्वरने आनंदवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही घटना घडताच क्षेत्री याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे रत्नागिरी सध्या हादरलं आहे.