अकोले :- शाळा सुरू झाल्याने अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथे भावजाई व पुतण्यांना आणण्यासाठी गेलेल्या संजय भानुदास हासे (चिखली, ता. संगमनेर) यास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
याबाबत संजय भानुदास हासे यांनी अकोले पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. १८ जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास मेहेंदुरी येथे संजय भानुदास हासे हे त्यांची भावजईचे माहेरी मेहेंदुरी येथून भावजाई व पुतण्यांना शाळा सुरू झाल्याने त्यांना आणण्यासाठी गेले होते.
यातील बाळासाहेब दगडू बंगाळ व सचिन बंगाळ (दोघेही रा. मेहेंदुरी) यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी संजय हासे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.