अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग,सात जणांविरुद्ध गुन्हा.

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीगोंदा :- तालुक्यातील एका गावातील संगणकाचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. हा प्रकार दि. ९ रोजी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबतची माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी संगणकाचे शिक्षण घेते. दि. ९ रोजी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सात जणांचा जमाव सदर मुलीच्या घरी गेला व तुम्ही आमच्या माणसांवर गुन्हे दाखल करतात,

असे म्हणत पीडितेस व तिच्या कुटुंबातील लोकांना ज़बर मारहाण करत जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. या वेळी काही लोकांनी सदर अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मारहाणीत सदर मुलीच्या आईला वीट लागल्यामुळे त्यांना दुखापत झाली आहे.

सदर घटनेबाबत पीडित मुलीने श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शाहरूख (मुबारक) शेख, सादिक शेख, राजू शेख, शाहबान शेख, शकील शेख, यास्मिन शेख, नूरजहाँ शेख, रा. सर्वजण महादेववाडी, ता. श्रीगोंदा. यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

अहमदनगर लाईव्ह 24