नालासोपारा :- बाप – मुलीच्या पवित्र नात्याला कलंक लागणारी घटना नालासोपारातील श्रीराम नगर परिसरात घडली आहे.
एका नराधम बापानेच स्वताच्या ७ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापास अटक केली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने तिच्या पती विरोधात केली आहे. पीडित मुलीची आई ही आपल्या पतीसोबत राहत असून तिला २ मुली आणि एक मुलगा आहे.
पिडीत मुलीचा बाप रिक्षाचालक असून पत्नी कामाला गेल्यावर नराधम पित्याने त्याच्या छोट्या मुलीला आणि मुलाला खेळण्यासाठी बाहेर पाठवलं आणि घरात आपल्याच ७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला.
आई जेव्हा घरी आली त्यानंतर या पीडित मुलीने आपल्यासोबत घडलेला घटनेबद्दल सांगितलं. आपल्या पतीच्या या कृत्यामुळे तिला एकच धक्का बसला. तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून त्या नराधम बापाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.