‘त्या’ ५ महिलांना पकडले जाणून घ्या कारण…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर शहरात काल वेश्या व्यवसाय करणार्यांना काल छापा टाकून महिला व गिऱ्हाईकांना पकडले ते प्रकरण ताजे असतांना आज पुन्हा पोलिसांनी नगर शहरात बस स्टॅन्ड व माळीवाडा परिसरात पुरूषांकडे पाहून खानाखुनी करून अश्लिल हावभाव करणा- या ५ महिलांना पकडले.

यामुळे अश्लिल कृत्य करणा-या महिलांना आपले तोंड रूमालाने बांधून पोलिस गाडीत बसण्याची वेळ आली. यावेळी महिला पोलिस कर्मचा-यांनी पकडलेल्या महिलांना पुढील कारवाईसाठी पोलिस गाडीत बसवून पोलिस स्टेशनला नेले.

नगर शहरात अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात हे परवा रात्री पडलेल्या छाप्यातून उघड झाले. त्याची गंभीर दखल वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी घेतली. व गुप्त माहितीवरून आज भरदिवसा बसस्टेन्ड परिसरात व माळीवाडा भागात पुरूषांकडे पाहुन अश्लिल खाणाखुना करणाऱ्या महिलांना पोलिसांनी पकडले.

त्यातील काही महिला पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्या. मात्र, महिला पोलिसांनी या महिलांना पकडले. नगर परिसरात अनेक ठिकाणी खाजगी गुप्तपणे अनैतिक व्यवहार चालतात. याची माहिती आता पोलिस घेत असून अश्लिल प्रकार व कुंटनखाना, शरीरविक्री प्रकार यावर आता पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24