गाडी लावण्याच्या कारणावरून एकास कोयत्याने मारहाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर : गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून एकास दोघजणांनी कोयत्याने मारहाण केल्याची घटना पारनेर तालुक्यातील कोहकडी शिवारात घडली आहे. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, कोहकडी येथे सोन्याबापू वसंत घावटे वय ३२ वर्षे रा.घावटे मळा,जा.शिरूर यांच्यात व ज्यातिराम कारखिले,नवनाथ कारखिले रा.राळेगण थेरपाळ, ता.पारनेर यांच्यात गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाले.

या वादातून ज्यातिराम कारखिले याने घावटे यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच इतर अनोळखी तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत सोन्याबापू वसंत घावटे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांत फिर्यादी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24