‘त्या’ कर्ज प्रकरणी ‘ह्या’ डॉक्टरांसह सात जणांविरूद्ध गुन्हा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-  नगर अर्बन बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखांमधील कर्ज प्रकरणात 22 कोटी 90 लाखाच्या रकमेचा अपहार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.

बॅकेचे व्यवस्थापक महादेव पंढरीनाथ साळवे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी डॉ. निलेश विश्‍वासराव शेळके, डॉ. विनोद आण्णासाहेब श्रीखंडे, डॉ. रवींद्र दौलतराव कवडे,

डॉ. भास्कर रखमाजी सिनारे, गिरीश ओम प्रकाश आग्रवाल, निर्मल एजन्सी, अहमदनगर आणि स्पंदन मेडिकेयर, पुणे यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की,

हॉस्पिटलमधील मशिनरी खरेदी करण्यासाठी आरोपी यांनी बँकेच्या केडगाव व मार्केट यार्ड शाखेत कर्जप्रकरण दाखल केले होते. यासाठी आरोपी हे एकमेकांचे जामीनदार राहिले.

तसेच डॉ. कवडे यांना गिरीश आग्रवाल हे जामीनदार राहून सदरील कर्जाच्या रक्कमेतून हॉस्पिटलसाठी कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता निर्मल एजन्सी,

नगर व स्पंदन मेडिकेयर, पुणे यांच्याबरोबर संगनमत करून त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले. यानंतर रोहिणी सिनारे आणि उज्वला कवडे यांच्या वयक्तीक बँक खात्यावर कर्जाची रक्कम ट्रान्सफर करून

कर्ज रक्कमेत गैरव्यवहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर कर्जाच्या रकमेतून मशिनरी न घेता परस्पर कर्जाची रक्कम कर्जदार व जामीनदार यांनी संगमनताने वैयक्तिक फायद्यासाठी वापरून बँकेच्या कर्जाच्या रकमेचा अपहार केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24