केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी व सहकारात संकट – ना.अशोकराव चव्हाण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर हे सहकाराचे मॉडेल – एच.के.पाटील संगमनेर (प्रतिनिधी ) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे जनसामान्यांच्या विकासाचे संस्कार घेवून नामदार बाळासाहेब थोरात हे रायात यशस्वीपणे नेतृत्व करत आहे.सहकाराने ग्रामीण भागात नंदनवन फुलविले आहे.

मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच रायातील शेतकरी व सहकार संकटात सापडला असल्याची टिका सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखान्याच्या 54 व्या गळित हंगाम शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील होते तर अध्यक्षस्थानी रायाचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे होते.

यावेळी व्यासपीठावर खा.राजीव सातव,आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसी चांद रेड्डी,आशिष दुआ, बी.एम. संदीप, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,बाजीराव पा.खेमनर,अ‍ॅड.माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख, मोहनदादा जोशी, पृथ्वीराज साठे,कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ,उपाध्यक्ष संतोष हासे,शंकर पा.खेमनर, शिवाजीराव थोरात,बाळासाहेब साळूंखे,-ाानेदव वाफारे,

सौ.मिराताई शेटे,हेमंत ओगले,इंद्रजितभाऊ थोरात, सुनंदाताई जोर्वेकर, लक्ष्मणराव कुटे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना ना.अशोक चव्हाण म्हणाले कि, शेतकरी व गोरगरिब यांचे प्रश्‍नाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून सुशांतसिंह प्रकरण,रिया चक्रवती,टी.आर.पी प्रकरण सुरु आहे. मागील 5 वर्षात केंद्राने आयात निर्णयासह सर्व धोरणे भांडवलदारांसाठीच घेतले आहे.

सहकार मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले.त्यामुळे अनेक साखर कारखाने बंद पडले.शेतकर्‍यांना एफआरपी दिली पाहिजे.मात्र उत्पादन खर्च धरुन साखरेची आधारभूत किंमत ठरवली जात नाही.त्यामुळे कारखान्याने अडचणीत आले आहे. या कारखान्यांना महाविकास आघाडी सरकारने 500 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करुन देण्याची हमी घेतली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्शवत तत्वे रायाला दिली.

नामदार बाळासाहेब थोरात हे सुसंस्कृत आहे. सर्वांना बरोबर घेवून महाराष्ट्रात ते यशस्वी नेतृत्व करत आहे. सहकारातून भाऊसाहेबांनी या भागाचे नंदनवन केले.समृध्द शिखर संस्था उभ्या केल्या.नामदार थोरातांनी त्या जपल्या आहे. सहकार या विभागाचे वैभव असल्याचे गौरवौद्गार त्यांनी काढले. एच.के.पाटील म्हणाले कि, संगमनेरचा सहकार हा देशात मॉडेल ठरणारा आहे. सहकारातून ग्रामीण भागात नंदनवन झाले.शेतकरी समाधनी झाले.

अडचणीच्या काळात ही थोरात कारखान्याने लौकिक जपला आहे.दरवर्षी एफआरपी पेक्षा ही 100 रुपये जादा भाव दिला.स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात हे देवरुपी माणूस होते. आदर्श संस्था व दुरदृष्टीतून त्यांनी हा विभाग समृध्द करतांना रायात नामदार बाळासाहे थोरात सारखे कतृत्वान नेतृत्व दिले असल्याचे सांगून शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळाला तर शेतकरी समाधानी होणार असल्याचे ही ते म्हणाले.

नामदार थोरात म्हणाले कि, थोरात कारखान्याने 800 टनापासून सुरुवात केली. पुढे 2000 मे.टन व 3500 मे.टनाची उभारणी केली.परंतू 5500 मे.टन व 30 मेगावॅट वीज निर्मितीसह नवीन अद्यावत कारखान्याची उभारणी केली. या निर्णय अत्यंत चांगला ठरला. या कारखान्याने कायम अडचणीतून मार्ग काढला आहे. एफआरपी पेक्षा जास्त भाव दिला आहे. कायम सभासदांसह बाहेरील शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन केला आहे.

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याने शेतकर्‍यांनी एकरी 100 टन उसाचे उत्पादन घेतले पाहिजे असे ही ते यावेळी म्हणाले. खा.राजीव सातव म्हणाले कि, मोदी दररोज वेगवेगळया घोषणा करतात.मात्र शेतकर्‍यांना काहीही देत नाहीत. मन की बात करतात. ना.थोरात हे दिल की बात करुन शेतकर्‍यांना मदत करतात. सलग 8 वेळा या विभागाने मोठया मताधिक्याने विजयी होण्याचे श्रेय जनतेचे असल्याचे नामदार थोरात हे कायम सांगत असून

हा विभाग सहकाराची पंढरी ठरली आहे असे ही ते यावेळी म्हणाले. आ.डॉ.तांबे म्हणाले कि, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांनी घालून दिलेल्या आदर्श,काटकसर,पारदर्शकता या त्रिसुत्रीवर या कारखान्याचे काम सुरु आहे.शिस्त ही धार्मिक भावनेने येथील कार्यकर्ते जपत असल्याचे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी नवनाथ अरगडे,सुरेश थोरात,आर.बी.रहाणे,अजय फटांगरे,सुभाष सांगळे, आर. एम. कातोरे,सोन्याबापू वाकचौरे,सौ.अर्चनाताई बालोडे,निर्मलाताई गुंजाळ,

संचालक चंद्रकांत पा.कडलग,गणपत सांगळे,रमेश गुंजाळ,निखील पापडेजा,रोहिदास पवार,मिनानाथ वर्पे,इंद्रजित खेमनर,संपतराव गोडगे,अभिजीत ढोले,भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे,तुषार दिघे,दादासाहेब कुटे,विनोद हासे,अनिल काळे,माणिक यादव,सौ.मंदा वाघ,मिराबाई वर्पे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ,

सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभार कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी मानले. शेतकरी व कामगारांची दिवाळी आनंदी यावर्षी कोरोनाचे संकट आहे. सर्वत्र आर्थिक मंदी आहे. मात्र कारखान्याने यावर्षी ही आपली परंपरा जपली असून दिवाळीत कामगारांना 20 टक्के बोनस मधून 5 कोटी 38 लख 75 हजार तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान 2 कोटी 68 लाख शेतकर्‍यांना ठेवींचे 1 कोटी 48 लाख व

सभासदांना 15 किलो साखर देण्यात येणार असल्याचे नामदार थोरात म्हणाले. 2022 पर्यत निळवंडे कॅनोलचे पाणी आणण्याचे काम आता मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी निळवंडे कॅनोलच्या कामाला सुरुवात केली. निळवंडेच्या कामाला गती दिली. कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी आहे. मात्र सर्व संकटातून मार्ग काढत 2022 पर्यत दुष्काळी भागाला कालव्यांद्वारे पाणी देण्याचा आपला मानस असल्याचे ही नामदार थोरात यावेळी म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24