अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- ठाकरे या नावाचा सन्मान आणि आदर ठेवावा, आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाळावे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनांना जनता विटलेली आहे. प्रत्येकवेळी केंद्रावर टीका करण्याच बोलणं म्हणजे ते राज्यसरकार चालवण्यास सक्षम नाहीत असं होतं.
अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केली. डाळिंब पिकाला मदत देण्या बाबतचे निकष बदलावे, शेतकऱ्यांना सोसायटी, खासगी सावकारी कर्ज आहे,
त्यामुळे 5 लाखा पर्यंतच कर्जमाफी करावी. आता दौरे नकोत, मदत लवकर द्या, तात्कालिक आणि दीर्घकालीन मदत घ्यावी.निर्धारित वेळ ठरवून मदत द्यावी,
तलावाचे निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले.तसेच मुंबई बँके कडून अजूनही चोकशी सुरू नाही, अद्याप कोणीही जबाबला मला बोलवलं नाहीये.
आम्ही डिफॉल्ट गॅरंटी बाबत विचारणा केली,म्हणून आणि तसेच साखर कारखान्यांना अर्थ सहाय्य कस केलं आम्ही विचारल्यावर त्यांनी अकसा पोटी त्यांनी चौकशी लावली.
माझ्यावर चौकशी लावण्या मागे, सांगली जिल्ह्यातील एक राजकीय नेता आहे, (जयंत पाटील यांचं नाव न घेता टीका) राजकीय आकसापोटी चौकशी लावली आहे.
इस्लामपूर मधील भाजपा नेते निशिकांत पाटील यांना आम्ही कर्ज दिल्या नंतर रागाला आलेल्या सांगलीतील नेत्याने चौकशी लावली आहे. मुंबई बँक उत्तम असताना या चौकशीतून काही साध्य होणार नाही असे प्रवीण दरेकर म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved