रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना सर्व बॅंकांमध्ये पीक कर्ज उपलब्ध- अग्रणी बॅंक व्यवस्थापक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर दि.9: जिल्हयात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. हया पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक असेल त्या नुसार सर्व शेतकरी बांधवांना येणा-या रब्बी हंगामासाठी पीक कर्ज सर्व बँका मध्ये उपलब्ध असल्याची माहिती अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर ( सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अहमदनगर) यांनी केले आहे.

शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. सन 2020-21 च्या दिनांक 30 सप्टेंबर 2020 ला समाप्त होणा-या खरीप हंगाम मध्ये जिल्हयातील सर्व बँका मिळून दिलेल्या लक्षांकाच्या 92 टक्के इतके पीक कर्ज वाटप केले आहे.

एकूण कर्जदार शेतक-यांची संख्या 383649 असून 3123 कोटी 44 लाख इतके पीक कर्ज वाटप झाले आहे. या खरीप हंगामाच्या काळात कोविड-19 सारख्या विषाणूची साथ असतांनाही सर्व बँकर्सनी,

बँकेत कर्मचा-यांची कमी उपस्थिती असतानाही हे उदिष्ट जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य केले आहे, असे श्री. वालावलकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24