कोरोनाच्या काळातही ‘या’ देवस्थानाला भाविकांची गर्दी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अद्यापही राज्यातील मंदिरे बंद आहे.

मंदिरे सुरु करण्यासाठी अनेक राजकीय मंडळींनी, लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेतला. मात्र मंदिरे खुली करण्यात आली नाही.

लॉकडाउनच्या काळात राज्यातील सर्व मंदिरे भाविकांविना असली तरी जिल्ह्यातील एका मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवालय बंद असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी प्रवरा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी पर्यटकांनी श्री क्षेत्र देवगड परिसरात मोठी गर्दी केली.

दरम्यान मंदिरे बंद असून परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन श्री क्षेत्र देवगड दत्त देवस्थानतर्फे करण्यात आले.

दरम्यान मठ, मंदिर, देवालये व ईतर धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत कुठेलेही निर्देश जारी केलेले नाहीत. त्यामुळे कोणीही देवगडला येऊन गर्दी करू नये. मंदिर परिसर महाद्वारापासूनच पुर्णपणे बंद आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24