दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सोमवारपासून खुले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर शिखरापासून विविधरंगी पणत्यांच्या भव्य प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.

तसेच महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून मंदिरे खुले करण्याच्या दिलेल्या निर्णयाचे मंदिर व्यवस्थापनाने स्वागत केले असून भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज असणार आहे.

दिवाळीनिमित्त मंदिरावर १०८ विविधरंगी भव्य पणत्या, २१ झुंबरे लावण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईदेखील करण्यात आली आहे.

मंदिराच्या दरवाजावर व संपूर्ण संरक्षक भिंतीवर फुलांची आकर्षक आरास व तोरणदेखील लावण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, लक्ष्मीपूजन,

नरक चतुर्दशीच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून मंदिरे व सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली करण्याची परवानगी दिल्याने

आम्ही सोमवारपासून भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज असणार आहोत. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24