धोकादायक! ‘या’ नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यासह महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होत असल्याने राज्यातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. गेल्या चार पाच दिवसापासून नगर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

दरम्यान श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण शनिवारी संध्याकाळी ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी हंगा नदी पात्रत वाहु लागले आहे. महसूल व पोलीस विभागाचे वतीने हंगा नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

विसापूर जलाशयाचे पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्या पासून चांगला पाऊस झाल्याने सलग दुसऱ्या वर्षी विसापूर जलाशय ओव्हरफ्लो झाला आहे.

हंगा नदीसह विसापूर जलाशयत येेेणाऱ्या ओढ्या नाल्यातुन पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात चालू असल्याने विसापूर खाली हंंगा नदीला पुुर येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनाने हंगा नदी काठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही नागरिकाने पाण्याच्या प्रवाहात जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24