अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर शहरात एका इसमाचा रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर मयत व्यक्ती ही संजयनगर परिसरामध्ये दिनांक 9 जानेवारी रोजी रेल्वेखाली आल्याने मयत झाला आहे.
त्याचे अंदाजे ४० ते ४५ असून शरीराने मजबूत व त्याच्या अंगात भगव्या रंगाचा टिशर्ट असून टी शर्टवर पाठीमागच्या बाजूस पदयात्रा मुसळगाव ते सप्तशृंगी असे लिहिलेले आहे .
पायात चप्पल , पांढऱ्या रंगाची फलपैंट , अंगात सँडो पांढरे बनियन व थंडीसाठी राखाडी रंगाचे जर्कीन असे मयताचे वर्णन असून मयताचा चेहरा रेल्वे खाली आल्याने ओळखू येत नाही.
या अनोळखी मृत व्यक्तीचा शोध पोलीस घेत असून या इसमासंबंधी कोणाला काही माहिती असल्यास पुढील मोबाईल नंबरवर संपर्क करावा ९९२१२१०६०० , ८८०५०१४८१७ असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.