झाडावर आढळला मृत बिबट्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सोनई :- बेल्हेकरवाडी येथे शनिवारी सकाळी एका शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास झाडावर मृत आवस्थेत बिबट्या आढळला.

त्याच्या पायात एक खटका आढळून आला असून हा शिकारीचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

झाडावर बिबट्या आढळल्यानंतर शेतकऱ्यांनी नेवासे येथे वनविभागाचे वनपाल दशरथ झिंजुर्डे यांना कल्पना दिली. त्यांनी घटनास्थळी पथकासह येऊन पाहणी केली.

रानडुकरे पकडण्याचा खटका बिबट्याच्या पायात गुंतल्यामुळे घाबरलेला बिबट्या पाय काढून घेण्याचा प्रयत्न करत सदर जांभळीच्या झाडांवर चढला असेल.

यातच त्याचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज वनपाल व ग्रामस्थांनी व्यक्त केला. बिबट्या नर असून व त्याचे वय अंदाजे एक ते दीड वर्ष होते.

बिबट्याचे शवविच्छेदन करून लोहोगाव येथील वनविभागाच्या नर्सरीमध्ये दुपारी आडीच वाजता त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24