राज्यात १५ डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-‘महाआवास अभियान-ग्रामीण’ अंतर्गत राज्यात १५ डिसेंबर हा दिवस ‘घरकुल मंजूरी दिवस’ म्हणून तर २० डिसेंबर हा दिवस ‘प्रथम हप्ता वितरण दिवस’ म्हणून अंमलबजावणी करण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषित केले आहे.

राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसांच्या कालावधीत ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविण्यात येत आहे. याचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.

राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), गटविकास अधिकारी (पंचायत समिती) सहभागी झाले होते.

मंत्री मुश्रीफ यांनी अभियानातील आतापर्यंतची प्रगती बघता अभियान काळात ८ लाख घरकुले पूर्ण करावयाची असल्याने प्रथम १०० टक्के मंजूरी व पहिला हप्ता वितरणावर लक्ष केंद्रीत करावयाच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या.

अभियानातील सर्व १० उपक्रमावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. विशेषत: त्यातील १०० टक्के घरकुल मंजूरी व मंजूर घरकुलांना पहिला हप्ता या उपक्रमांवर १५ डिसेंबर व २० डिसेंबरपर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अभियान १०० दिवसात यशस्वी करावे, असे आवाहन केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24