अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- साहेब पोलीस भरतीचा निर्णय लवकर घ्या आमचे वय निघून चालले आहे गावातील लोक आमची चेष्ठा करत आहेत पण शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारे सरकार आहे त्यामुळे आपण बहुजन समाजातील तरुणांना पोलीस भरती साठी संधी द्यावी अशी भावनिक साद राज्याचे मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे .
आढळगाव येथील एका तरुणाने . स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या अमोल सोनवणे या विद्यार्थ्याने पत्राद्वारे केली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि ,आढळगाव येथील व मुंबई येथे पोलीस दलात सेवा निवृत्त झालेले सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर ठवाळ यांनी गावात अमित बिनीव्हॉलेंट करियर अकादमी या नावाने सर्वसामान्य व गरीब मुलांसाठी स्वतःच्या गावातच स्वखर्चाने मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अभ्यासिका उभारली आहे
या अभ्यासिकेत भरतीपूर्व अभ्यास करणारा शेतकऱ्याचा मुलगा अमोल सदाशिव सोनवणे याने अतिशय भावनिक पत्र लिहून पोलीसभरतीसाठी मुख्यमंत्री यांनी तात्काळ निर्णय घ्यावा असे भावनिक पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे विनंती केली आहे
त्याच बरोबर या पत्रात अमोल सोनवणे याने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात अतिशय भावनिक साद घालताना म्हटले आहे कि पोलीस भरती साठी अगोदर मैदानी परीक्षा घेतली जाणार का ?लेखी परीक्षा ?याचा निर्णय घेणे गरजेचे आहे त्याच्या पेक्षा महत्वाचे सध्या ज्या मुलांनी पोलीस भरतीसाठी तयारी केली आहे
त्या मुलांचे वय निघून चालले आहे त्यामुळे हि भरती करताना वयाची मर्यादा तीन वर्षाने वाढवावी ,तशेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर सध्याची भरती प्रकिया रखडली आहे तरी आपण या आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घेऊन भरतीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved