अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- मराठा आरक्षणासाठी येत्या ७ नोव्हेंबरला मराठा मोर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर धडकणार आहे. सकल मराठा समाजाकडून ‘मशाल मोर्चा’ काढून मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
रविवारी झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी मुंबईत मराठा संघर्ष जनजागृती यात्रा पार पडली.
या वेळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांत संघर्ष यात्रा झाली. मुंबईतील लालबाग ते ठाणे अशी जनजागृती यात्रा काढण्यात आली.
सकाळी १० वाजता मुंबईत प्रारंभ झालेली ही यात्रा सायंकाळी ठाण्यात पोहोचली. ही यात्रा ‘मराठा जोडो’ अभियान असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved