अहमदनगर Live24 टीम,14 ऑगस्ट 2020 :- सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या समवेत संभंधितांसमवेत 13 ऑगस्ट रोजी सोलापूर विभाग मध्य रेल्वे सल्लागार समितीची बैठक झूम अॅपद्वारे संपन्न झाली.
या बैठकीत विविध मागण्या करण्यात आल्या. या बैठकीमध्ये नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करावी, अशी मागणी सदस्य हरजितसिंग वधवा यांनी केली.
तसेच नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, तसेच नगर येथे रेल्वेचे हॉस्पिटल हे मुद्दे वधवा यांनी यावेळी उपस्थित केले. वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी प्रदीप हिरडे म्हणाले, रेल्वेचे नवे वेळापत्रक तयार होत असून त्यात बरेच बदल होणार आहे.
नगर-पुणे इंटरसिटी ट्रेनकरिता प्रयत्न केले जातील. पुण्याकरिता २२ गाड्या आहेत. मात्र, कोरोनाच्या काळात फक्त चार गाड्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर-पुणे रेल्वेबाबत खासदार सुजय विखे यांनी लोकसभेत मागणी केली असल्याचे वधवा यांनी नमूद केले.
या बैठकीमध्ये सोलापूर विभागाचे मुख्य प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी शिर्डी -दौंड- पुणे- मुंबई ही जलद पॅसेंजर 19 बोगीची करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, या बैठकीत बेलापूर (श्रीरामपूर) रेल्वे स्थानक वरील दुर्लक्षीत मागण्यांसंदर्भात चर्चा होऊन प्लॅटफार्म नं. 1 व 2 वरील मालधक्क्याजवळ जोडणारा ब्रीज व 24 बोगी थांबू शकतील असा मोठा प्लॅटफार्म करण्याचे व त्याचे काम त्वरीत सुरू करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.
तसेच प्लॅटफॉर्म नंबर 2 वर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधण्याचे व उपहारगृह व फ्रुट स्टॉल करिता मंजुरी घेऊन सुरू करण्याचे आश्वासन दिले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved