अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- पावसामुळे नगर तालुक्यातील अनेक रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असून, रस्त्यावरील खड्डे लहान-मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे.
तातडीने रस्त्यांची डांबराने पॅचिंग करण्याच्या मागणीसाठी नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आला.
या आंदोलनात नगर तालुकाध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, गजानन भांडवलकर, अक्षय भिंगारदिवे, वैभव म्हस्के, विशाल म्हस्के, विकास झरेकर, मनोज औशिकर, प्रितेश दरेकर, गणेश दरेकर, वैभव शेवाळे,
दादा शिंदे, दत्तात्रेय बोठे आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगर तालुक्यातून जाणार्या सर्वच रस्त्यांची दुरावस्था झाली असून, मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. जीव मुठीत धरुन वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे.
खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत असून वाहनांचे देखील नुकसान होत आहे. याचा भुर्दंड वाहनचालकाला बसत आहे. या रस्त्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.
सध्या टाळेबंदीनंतर जनजीवन पुर्वपदावर येत असताना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे सर्वसामान्य जनेतेचे हाल होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नगर-सोलापुर, नगर-कल्याण महामार्ग तसेच तालुक्यातील इतर रस्ते पाहिले तर खूप वाईट अवस्था झाली आहे. नगर तालुक्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डयांची पॅचिंग डांबराने करण्याची मागणी
नगर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन कार्यकारी अभियंता संजय पवार यांना देण्यात आले. पवार यांनी आंदोलकांना शासनाला मंजुरीसाठी पॅचिंगचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून,
एक महिन्याची सदर कामाची प्रक्रिया पुर्ण करुन रस्त्याचे खड्डयांचे डांबराने पॅचिंगचे काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved