अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले असून, मार्च ते जून महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टी अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी अॅड.जावेद काझी, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, रवी सातपुते, संपत मोरे, प्रकाश फराटे, संदीप कनोजिया आदी उपस्थित होते.
देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाशी डॉक्टर, वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचारी, परिचारिका, पोलीस प्रशासन व महसूल कर्मचारी लढा देत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी सदरील कोरोना योध्दे देत असलेले योगदान अतुलनीय असल्याचे स्पष्ट करुन
आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला आहे. तर कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा बंद आहेत.
त्यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य माणूस आर्थिक संकटात सापडला आहे. सर्वसामान्यांना या संकटकाळात सावरणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारने दिलेल्या 20 लाख कोटी पॅकेज मधून, महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे लॉकडाऊन काळातील मार्च ते जून या तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews