अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना समाजात सन्मानपूर्वक वागणूक व त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहण्यासाठी दिव्यांग अधिकार कायदा 2016 पारित केला असून
देशातील सर्व राज्यांमध्ये भारत राज्यपत्र अन्वये दिनांक 19-4- 2017. पासून अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे या कायद्यात कलम 92 नुसार दिव्यांग व्यक्तीस अपमानास्पद वागणूक,
दिव्यांगाचे शोषण, गैरवर्तणूक आदीनुसार दंडासह शिक्षेची तरतूद आहे परंतु याबाबत समाजात जागरूकता निर्माण व्हावी व दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींना प्राधान्य व अग्रक्रम देण्यात यावा याकरिता जन आधार सामाजिक संघटनेच्या प्रणित दिव्यांग सेल वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे,
तालुका संघटक विजय वाळके, अहमदनगर जिल्हा अपंग सेलचे अध्यक्ष सोमनाथ पवार, शहराध्यक्ष शहानवाज शेख, मच्छिंद्र गांगर्डे, शिवाजी कुंदनकर, दीपक गुगळे, अमित गांधी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.