राज्यातून सर्व झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये नवीन बदल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. महाराष्ट्राने या चौथ्या टप्प्यासाठी आपले नियम बदलले आहेत. ही नियमावली येत्या २२ मे पासून लागू होणार आहे.

यानुसार महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेनमेंट झोन असणार आहे. राज्यात आता २२ मेपासून रेड आणि नॉनरेड असे दोनच झोन अस्तित्वात असणार आहेत.

आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो सेवा, शिक्षण संस्था, हॉटेल, शॉपिंग मॉल बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कन्टेन्मेंट सोडून दोन्ही झोनमध्ये मद्य विक्री सुरु राहणार आहे.

लग्न, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहेत. रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना संचारबंदी लागू असणार आहे.

रेड झोनमध्ये आहे ही शहरे मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत.

तर राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये येणार आहे. कंटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानक प्रशासनावर देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24